» खरेदी शाखा
खरेदी विषयक नियमावली

शासन निर्णय क्रमांक (उद्योग,उर्जा व कामगार विभाग)भाखंस-1088/(2512)/उद्योग-06, दिनांक-2/1/1992 मधील नमुद केलेल्या तरतुदीनुसार भांडार साहित्य खरेदी करणेकरीता खरेदी विषयक कार्यवाही घेतली जाते.

दरपत्रकानुसार खरेदी :-

शासन निर्णय क्र.उद्योग,उर्जा कामगार विभाग/1002/(2635)उद्योग-06,दिनांक 16/7/93 अन्वये 50 हजार किंमतीचे आतील भांडार साहित्य खरेदी ही स्थानिक बाजारपेठेतील नोंदणीकृत पुरवठादारांकडुन तीन दरपत्रके मागवुन केली जाते.

निविदा प्रक्रियेव्दारे खरेदी :-
50 हजार किंमतीचे वरील रकमेची खरेदी जाहिर खुल्या स्पर्धात्मक निविदा मागवुन केली जाते. निविदा प्रसिध्दीकरीता संचालक,जनसंपर्क व माहिती महासंचालनालय,महाराष्ट्र राय,मुंबई यांचेकडे ’अ’ वर्ग स्तरावरील एक मराठी व एक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्याकरीता तसेच शासकिय गॅझेटमध्ये निविदा प्रसिध्द करण्याकरीता मॅनेजर,गव्हर्नमेंट सेंट्रल पे्रस,मुंबई यांचेकडे प्रसिध्दकरीता माहिती सादर केली जाते.

निविदा फॉर्म विकत घेणेकरीता भांडार साहित्याच्या किंमतीनुसार ना परतावा रक्कम ठरविण्यात आलेली आहे. निविदा शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे

साहित्याची अंदाजे किंमत निविदा फॉर्म शुल्क किंमत
रु. 50,000/- पर्यंत रु. 10/-
रु. 50,000/- ते 1,00,000/- रु. 250/-
रु. 1,00,000/- ते 2,00,000/- रु. 500/-
रु. 2,00,000/- ते 5,00,000/- रु. 750/-
रु. 5,00,000/- ते 10,00,000/- रु. 1000/-
रु. 10 लाखावरील रु. 2000/-
निविदा दोन लिफाफे पद्धतीने स्विकारल्या जातात.
 1. तांत्रिक लिफाफा :- तांत्रिक लिफाप्यामध्ये खालील बाबी अंतर्भुत असणे आवश्यक आहेत.
  • निविदा शुल्क Demand Draft चे स्वरुपात स्विकारले जाते.
  • अनामत रक्कम भांडार साहित्याचे किंमतीच्या 3% अथवा कमीतकमी रु.5,000/- पर्यंत बयाणा रक्कम Demand Draft चे स्वरुपात जोडणे आवश्यक असते.
  • निविदाकार जर व्यापारी घटक असेल तर या उत्पादकाच्या वस्तुकरीता त्याने निविदा भरली आहे अशा उत्पादकाचे प्राधिकारपत्र ( Authorisation Letter ) जोडणे आवश्यक आहे.
  • विक्रिकर भरलेबाबतचे संबंधीत विभागाचे Vat भरलेबाबतचे (Vat Clearance Certificate)
  • विक्रिकर नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • पूर्व अनुभवाचा तपशील
  • साहित्याचा पुरवठा पुर्णपणे करणेकरीता उद्योग घटकाकडे उपलब्ध असणारी यंत्रसामुग्रीची माहिती
  • पॅन कार्डची छायांकित प्रत
  • निविदाकार जर लघु उद्योजक असेल व त्यास टेंडर फॉर्म शुल्क व बयाणा रक्कम भरण्यापासुन सुट असेलतर त्याबाबतचे दस्तऐवज
  • निविदाकाराने विनिनिर्देशानुसार साहित्याचे दोन Sample देणे आवश्यक आहे
 2. व्यापारी लिफाफा :- भांडार साहित्याच्या दरासंबंधीचा
  • Basic Price par
  • Optional Ex
  • Custum Duty
  • Excise Duty
  • Education Cess
  • Vat
  • Insurance
  • Packing Charges
  • Transport
  • Forwarding Handling Charges
  • Installation Charges
  • Training Charges par

   Total Final 1 to 12 par

   Special Note :- भांडार साहित्याचा वॉरंटी कालावधी नमुद करणे अत्यंत आवश्यक आहे.
निविदा मागविण्याचा कालावधी
निविदा प्रसिध्द झाल्यापासुन 21 दिवसांनी नमुद तारीख व दिलेल्या वेळेपर्यंत निविदा टेंडर बॉक्समध्ये टाकणे आवश्यक आहे. दिलेल्या वेळेसच टेंडर बॉक्स उघडुन निविदा काढल्या जातात. नंतर आलेल्या निविदांचा विचार केला जात नाही. par

खरेदीसमिती:-
पोलीसअधीक्षक,बिनतारी संदेश,मुख्यालय,पुणे यांचे अध्यक्षतेखाली खरेदी समिती गठीत करण्यात आलेली आहे. खरेदी समितीमध्ये खालीलप्रमाणे अधिकारी/कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
 1. SPW.HQ.Pune - अध्यक्ष
 2. SPW.WZ.Pune - सदस्य
 3. DY.SPW.HQ,Pune - सचिव
 4. PWI.CS.Pune - सदस्य
 5. Acctt.Officer,DPW Office - सदस्य
 6. Office Supdt.,DPW.Office - सदस्य
 7. Head Clerk,Purchase Branch - सदस्य
खरेदी समितीसमोर तांत्रिक लिफाफे हे कंपनी प्रतिनिधीसमक्ष ठरविलेल्या वेळेत उघडण्यात येतात. शासनाला स्पर्धात्मक दरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या वस्तु उपलब्ध व्हाव्यात यासाठी तांत्रिक लिफाप्यामध्ये काही त्रुटी असल्यास निविदाकारांना जास्तीत जास्त संख्येने निविदामध्ये सहभागी होण्याची संधी देणे हा दृष्टीकोन ठेवुन तांत्रिक लिफाप्यामध्ये काही किरकोळ स्वरुपाच्या त्रुटी असतील तर अशा त्रुटींची पुर्तता निविदाकारांकडुन करवुन घेतली जाते.

व्यापारी लिफाफा उघडणे :-
साहित्याच्या विनिनिर्देशानुसार निविदाकाराने दिलेले Sample तांत्रिक शाखेकडुन तपासणी करुन Sample ग्राहय असल्याबाबत चाचणी अहवाल प्राप्त झालेनंतर व किमान तीन निविदाकारांचे Sample ग्राहय असल्यास दरासंबंधीचा व्यापारी लिफाफा उघडणेबाबतची तारीख व वेळ संबंधीत निविदाकारास कळविली जाते.त्याच तारखेस व वेळी दरासंबंधीचा लिफाफा खरेदी समितीसमोर कंपनी प्रतिनिधीसमक्ष उघडला जातो. तसेच निविदा सुचनेस दोन मुदतवाढी देण्यात आल्यानंतरही एकाच निविदाकाराचे साहित्याचे Sample स्विकृत असल्यास, दरासंबंधीचा एकमेव व्यापारी लिफाफा खरेदी समितीने त्यांचे वरिष्ठ अधिका-यासमोर उघडण्याची तरतुद Purchase Manual-Chapter IV,Part-II (F)मध्ये नमुद आहे.

साहित्य पुरवठा आदेश देणेबाबतची कार्यवाही :-
a) स्विकृती पत्र --
कमीत कमी दराचा पुरवठा करणारे निविदाकारास प्रथम स्विकृती पत्राचे (Acceptance of Letter) लिखाण करुन त्यांचेकडुन साहित्याच्या एकुण किंमतीच्या 3% सुरक्षा ठेव साहित्याच्या हमीपोटी Warranty कालावधीकरीता भरणेबाबत तसेच विहीत नमुन्यात Agreement Bond (मुद्रांक शुल्क काढण्याची पध्दत रु 20,000/- पर्यत 3%,रु 40,000/- पर्यत 4%, नंतरच्या येणा-या रकमेवर 5%)Stamp Duty हा किंमतीच्या मुद्रांक नोटरीकडुन नोटराइज करुन घेतले जाते. तसेच स्विकृतीपत्रामध्ये Payment इतर Terms & Condition मान्य असलेबाबत Confirmation Letter सादर करणेबाबत अंतर्भुत असते

b) अंतिम पुरवठा आदेश :-
कमी दराने पुरवठा करणा-या निविदाकाराकडुन वरिलप्रमाणे Security Deposit, Agreement Bond चे Terms & Condition मान्य असलेबाबतचे Confirmation Letter प्राप्त करुन अंतिम पुरवठा आदेश देण्यात येतो. अंतिम पुरवठा आदेश खरेदी विषयक नियमावली परिशिष्ठ X नुसार दिला जातो. पुरवठा आदेशामध्ये Date of Delivery नमुद केला जातो. पुरवठा कालावधी हा निविदाकाराने त्याचे निविदेमध्ये नमुद केलेल्या कालावधीप्रमाणेच दिला जातो.

c) पुरवठा कालावधी वाढवुन देणे :-
ठरवुन दिलेल्या कालावधीमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यास निविदाकार असमर्थ ठरलेतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये तसे ठोस कारण असल्यास पुरवठा कालावधी फक्त 21 दिवसांनी वाढवुन देण्याची तरतुद खरेदी विषयक नियमावली परिशिष्ठ-8 मधील 15 अन्वये देता येते. मात्र पुरवठादाराने ठोस समर्थन देणे आवश्यक आहे व कारणाची खात्री झाल्यानंतरच पुरवठा कालावधी वाढवुन दिला जातो.

d) विलंब शुल्क आकारण्याची पध्दत :-
खरेदी विषयक नियमावली परिशिष्ठ X - मधील नियम X(a) नुसार साहित्याचे रक्कमेवर विलंब शुल्क आाकारण्यात येतो. ते खालीलप्रमाणे
एक लाखाचे आतील किंमतीस एक लाखाचे वरील किंमतीस
0.5 % प्रत्येक एक आठवडयात जास्तीत जास्त दहा हजार जास्तीत जास्त प्रत्येक आठवडयाला 5% प्रत्येकी
पुरवठादाराकडुन साहित्य प्राप्तीनंतर सर्व साहित्य तपासणीकरीता या कार्यालयातील तांत्रिक विभागाकडे पाठविली जातात. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिलास मंजुरी घेऊन देयक कोषागारात पाठविले जाते. ---5--- ---5--- par

बयाणा रकमा परत करणेबाबत:-
खरेदी विषयक प्रक्रिया पुर्ण होऊन अंतिम पुरवठा आदेश देण्यात आल्यानंतरर् र्ंिनविदेमध्ये भाग घेतलेल्या निविदाकारांनी जमा केलेली बयाणा रक्कमा शासन निर्णय 2/1/1992 च्या परिशिष्ठ-12 नुसार परत करण्यात येतात.

प्रोप्रायटरी पध्दतीने खरेदी करावयाची कार्यवाही :-
या यंत्रसामुग्रीचे सुट़टे भाग इतरत्र उपलब्ध होत नाहीत अथवा यंत्रासाठी Suitable नाहीत असे सुट़टे भाग खरेदी नियमावली-Chapter IV,Part,1(4) नुसार प्रोप्रायटरी तत्वावर मुळ पुरवठादार यांचेकडुन खरेदी करण्याची तरतुद आहे.
प्रोप्रायटरी पध्दतीने खरेदी करताना दुस-या कोणत्याही Makeचे पर्यायी साहित्य Suitable होत नाही याकरिता बिनतारी संदेश विभागाचे विभाग प्रमुख यांचे खरेदी विषयक नियमावलीमधील परिशिष्ठ-III च्या तरतुदीनुसार खालीलप्रमाणे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. par

APPENDIX III
Proprietary Article Certificate par
(i) The equipment/stores wanted is manufactured by Messrs . ... . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . .. . . . . . . . . . par No other make is acceptable for the following reason :- . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
(ii) Approval of the Head of the Department or his nominee has been obtained. par par

पुन:प्रर्त्ययी पुरवठा आदेश (Repeat Order):-
निविदा प्रक्रिया राबवुन साहित्याचा अंतिम पुरवठा आदेश देण्यात आल्यानंतर,त्याच प्रकारचे साहित्य खरेदी करण्याचे असल्यास उद्योग,उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक भाखंस/1088/(2512)/उद्योग-06,दिनांक 2/1/1992 मधील परिशिष्ठ-7,परिच्छेद 8.3 (ह) मध्ये नमुद केलेल्या खालील मार्गदर्शक तत्वानुसार पुन:प्रर्त्ययी आदेश (Repeat Order) देणेबाबत तरतुद आहे.
पुनर्प्रत्ययी आदेश देताना ते मुळ आदेशाच्या तारखेपासून सहा महिनेच्या अवधीतच खालील मार्गदर्शक तत्वानूसार देण्यात यावेत.
 1. पुनर्प्रत्ययी आदेश हे मुळ दरापेंक्षा जास्त नाही अशा दराने देण्यात यावेत.
 2. जर मुळ आदेश हे तत्कालीक/आकस्मिक स्वरुपाचे असतील तर त्या आदेशांवर पुनर्प्रत्ययी आदेश देण्यात येवू नयेत.
 3. वस्तूचा दर्जा मुळ आदेशान्वये नमूद केलेल्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसावा.
 4. या वस्तूची खरेदी पुनर्प्रत्ययी आदेशान्वये प्रस्तावित केली आहे. त्या वस्तूच्या बाजारातील किंमती मूळ आदेशापेक्षा कमी नसतील वा कमी होणार नसतील किंवा
 5. हया किंमती स्थिर आहेत वा प्रमाणीकृत आहेत याची शहानिशा करण्यात यावी,तसेच याबाबत टिपण्णी संबंधीत कागदपत्रांसहित सामान खरेदी समितीपुढे सादर करणे आवश्यक आहे.
 6. मूळ आदेशातील संख्या आणि/किंमत यापेक्षा पुनर्प्रत्ययी आदेश 200 टक्क्यापर्यंत मर्यादित असावा. पुनर्प्रत्ययी आदेशान्वये लागणारी संख्या वा तिची गरज याविषयी संबंधीत सामान खरेदी समितीने खात्री करुन घ्यावी.
 7. नवीन निविदा चौकशी प्रसिध्द करण्यास तसेच वस्तुंची प्रयोगशाळेकडुन नमुना चाचणी करुन घ्यावयास वेळ लागेल म्हणुन पुनर्प्रत्ययी आदेश पध्दत अवलंबण्यात येत आहे.याविषयी सामान खरेदी समितीने खात्री करुन घेणे आवश्यक आहे.
 8. सर्व पुनर्प्रत्ययी आदेशांचे प्रस्ताव सामान खरेदी समितीनेच मंजुर करावयाचे आहेत.

  वरील क्रमांक (1)ते (3) या मार्गदर्शक तत्वांमध्ये सूट देऊन पुनर्प्रत्ययी आदेश द्यावयाचे असतील तर मंत्रालयीन प्रशासकिय विभागाकडुन पूर्वमंजुरी घेणे आवश्यक राहील.
दरकरारावरील खरेदी :- Directorate General of Supplies & Disposals, New Delhi यांचेकडे पुरवठादाराने नोंदणी केलेली असते. दर शासन नियंत्रित असतात. DGS & D दरकरारानुसार साहित्याची खरेदी केली जाते.

सुरक्षा ठेव जप्त करणे :- पुरवठा आदेश देण्यात आल्यानंतर साहित्याचा पुरवठा न केल्यास अथवा पुरवठा करण्यास टाळाटाळ केल्यास पुरवठादाराने जमा केलेली सुरक्षा ठेव जप्त करण्याची खरेदी विषयक नियमावलीमध्ये तरतुद आहे.

पुन:प्रर्त्ययी पुरवठा आदेश (Repeat Order):- निविदा प्रक्रिया राबवुन साहित्याचा अंतिम पुरवठा आदेश देण्यात आल्यानंतर,त्याच प्रकारचे साहित्य खरेदी करण्याचे असल्यास उद्योग,उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक भाखंस/1088/(2512)/उद्योग-06,दिनांक 2/1/1992 मधील परिशिष्ठ-7,परिच्छेद 8.3 (ह) मध्ये नमुद केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पुन:प्रर्त्ययी आदेश (Repeat Order) देणेबाबत तरतुद आहे.