महाराष्ट्र शासकीय कर्मचार्याचे बदल्याचें विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना
होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005
"बदली "यांचा अर्थ शासकीय कर्मचार्याची एका पदावरुन किंवा एका कार्यालयातून किवां
एका विभागातून दुसर्या पदावर दुसर्या कार्यालयात किवां दुसर्या विभागात होणारी पदस्थापना
अशी आहे. पद स्थापनेचा पदावर्धी , बदली व बदली करणारे प्राधिकारी खालील प्रमाणे
अखील भारतीय सेवेतील अधिकारी आणि अ , ब , क गटातील राज्य शासनाचे सर्व सेवक यांचे करीता
एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी 3 वर्षाचा असेल पंरंतू अशा कर्मचारी हा गट
क मधील बिगर सेक्रेटरीयट सेवेतील कर्मचारी असेल तर अशा कर्मचार्याने धारण केलेल्या
पदावर दोन पुर्ण पदावधीची सेवा पुर्ण केल्या नंतर त्यांची त्या कार्यालयातून किवां
विभागातू न दुसर्या कार्यालयात किवां विभागात बदली करण्यात येईल . तसेच अशा कर्मचार्याला
3 वर्षापेक्षा अधिक कालावधी साठी त्याच पदावर ठेवण्यात येणार नाही. आणि लागोपाठच्या
दोन पदावधी पेक्षा अधिक पदावधी साठी त्याला त्या विभागात ठेवता येणार नाही.
गट ड मधील कर्मचार्यासाठी सामान्य पणे पदावधी निश्चित केला जाणार नाही. त्यांनी बदली
साठी विनंती केली असेल तर व त्या कार्यालयात रिक्त पद असल्या खेरीज किवां परस्पर संमतीने
बदली मागितली असल्यास किंवा त्यांचे विरुध्द गंभीर स्वरुपाची साधार तक्रार असल्या
खेरीज त्यांची अन्य ठिकाणी बदली केली जाणार नाही.
सामान्य पणे कोणत्याही शासकीय कर्मचार्याने कलम तीन मध्ये तरतूद केल्या प्रमाणे त्यांचे
नेमणुकीचा पदावधी पुर्ण केल्याखेरीज त्यांची बदली करण्यात येणार नाही.
सक्षम प्राधिकारी हे प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यात त्यावर्षी एप्रील व मे महिन्यात
पात्र होतील अशा शासकीय कर्मचार्यांची यादी तयार करतील .
शासकीय कर्मचार्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून केवळ एकदाच एप्रील किवां मे महिन्यात
करण्यात येतील . पंरतू खालील नमूद केलेल्या परिस्थीतीत वर्षातील कोणत्याही वेळी .
- नव्याने निर्माण केलेल्या पदावर.किवां सेवानिवृ्त्ती , पदोन्नती ,राजीनामा, पदावनती,पुर्नस्थापना
यामुळे किंवा बदलीच्या परिणामास्वरुप रिक्त झालेल्या पदावर किंवा रजेवरुन परत आलेबाबतीत
- आपवादात्मक परिस्थीतीमुळे किवां विशेष कारणामुळे बदली करणे आवश्यक आहे अशी सक्षम प्राधिकार्याची
खात्री पटली असेल अशा बाबतीत तसे लेखी नमुद केल्यानंतर आणि लगत नंतरच्या वरिष्ठ प्राधिकार्याच्या
पुर्वमान्यतेने अशी बदली करता येईल .
शासकीय सेवक व कर्मचारी यांच्या नेमणुकीचा कलम तीन मध्ये निर्धारीत केलेला पदावधी खालील
विनिदिष्ट केलेल्या आपवादात्मक प्रकरणामध्ये वाढविता येईल.
- नेमणुकीच्या ठिकाणी किवां पदावर पदावधी पुर्ण केल्यानंतर बदली साठी पात्र झालेल्या
कर्मचार्याच्या सेवानिवृत्तीसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तेव्हा.
- कर्मचारी एखाद्या विशिष्ट कामासाठी आवश्यकती तांत्रिक अर्हता किवां अनुभव धारण करणारा
असेल व त्या पदासाठी योग्य असा बदली कर्मचारी तात्काळ उपल्बध होत नसेल तेव्हा.
- एखादा कर्मचारी एखाद्या प्रकल्पावर काम करीत असेल व तो प्रकल्प पुर्णतेच्या शेवटच्या
टप्पयात असेल आणि त्याला तेथून काढून घेण्याने प्रकल्प वेळेत पुर्ण होणेस धोक्यात येणार
असेल तेव्हा.
- कोणत्याही कार्यालयातील किवां विभागातील तीस टक्क्यापेक्षा अधिक नसतील इतक्या कर्मचार्यांची
एका वर्षात एकाच वेळी बदली करण्यात येणार नाही.