» आस्थापना शाखा » पदोन्नती
पोलीस बिनतारी संदेश विभागातील पोलीस शिपाई ते उप निरीक्षक बि.सं. पदावर पदोन्नती देण्यासाठी निवडसूची तयार करण्यासाठी खालील प्रमाणे सर्वसाधारण निकष लावण्यात येतात
 • महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने माहे 9/1992 मध्ये प्रकाशित केलेल्या " मागासवर्गीयांना सेवेत आरक्षण व इतर सवलती " या पुस्तकातील प्रकरण 5 मध्ये पदोन्नतीच्या संदर्भात निवडसूची करण्याबाबत शासनाने निर्गमित केलेल्या सूचना विचारात घेऊन तसेच वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या शासन आदेश विचारात घेऊन निवडसूची तयार करण्यात येते.
 • सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : बीसीसी 2001/1887/प्र.क्र.64/01/16ब, दि.25/5/2004 पदोन्नती ही योग्यतेनुसार वरिष्ठता ( Seniorirty subject to fitness ) या तत्वावर मागासवर्गीयांना असलेले आरक्षण विचारात घेऊन निवडसूची तयार करण्यात येते.
 • सामान्य प्रशासन विभाग क्रमांक :बीसीसी-1097/प्रक्र-63/97/16ब, दि.18/101997 अन्वये शासनाने विहीत केलेल्या मंजूर पदाचे टक्केवारीप्रमाणे आरक्षण अनुशेष विचारात घेऊन व सध्याची रिक्त पदे व संभाव्य रिक्त पदांचा अनुशेष विचारात घेऊन निवडसूची तयार करण्यात येते.
 • सामान्य प्रशासन विभाग शा.नि.एसआरव्ही-2005/प्रक्र 1/2005,/बारा , दि.25/9/2005 अन्वये संबधित कर्मचा-यांने निकटतम निम्न पदावर नियमीत 3 वर्षाचा किमान सेवेची अट नियमित पदोन्नती साठी राहिल. परंतु मागासवर्गीय अनुशेष भरताना बाधा येऊ नये म्हणून शा.परिपत्रक सा.प्र.वि.क्र.एसआरव्ही-2003/सीआर-18/ 2003/12, दि.22/09 2003 मधील तरतुदीनुसार निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीसाठी निम्न पदावर नियमीत 3 वर्षाचा किमान सेवेची अट शिथील करुन सदर कालावधी 2 वर्षाचा केलेला आहे. त्याबाबतचा विचार करण्यात येतो.
 • निवडसूची तयार करतांना पोलीस नियमावली खंड 1 मधील नियम 59 अ मधील मधील तरतुदीनुसार सपोउनि. ( रेडिओ यांत्रीकी ) यांनी खात्यांतर्गत परिक्षा वर्गीकरण वर्ग-1 उत्तीर्ण असणे, पोलीस हवालदार (बिनतारी यांत्रचालक ) यांनी प्राविण्य परिक्षा पास व बेसीक सायफर कोर्स पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे. पोलीस हवालदार ( वीजतंत्री ) यांना वर्गीकरण परिक्षा वर्ग 1 पास असणे आवश्यक आहे. अशा कर्मचा-याची सेवायेष्ठतेनुसार प्रवर्गनिहाय निवड यादी करण्यात येते.
 • तसेच संबधित कर्मचा-याविरुध्द काही विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसल्याची खात्री करुन किंवा कोणतेही न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहे काय ? याबाबत पडताळणी करुन तशी माहिती समीतीपुढे सादर करण्यात येते.
 • पदोन्नतीस पात्र /अपात्र ठरविण्यात येते पदोन्नतीसाठी पात्र ठरविताना कर्मचा-यांना मिळालेल्या बक्षीसे / गंभीर/सौम्य शिक्षा इत्यादी बाबी निवड समिती विचारात घेते.
 • सदर निवडसूचीचा कालावधी एक वर्षाचा असतो.
 • निवडसूचीत पात्र ठरण्यासाठी कमीत कमी मागील 5 वर्षाचे सेवापटातील शेरे विचारात घेतले जातात . सर्वसाधारण शेरे बी + असावे . शेवटच्या सलगचे 3 वर्षाचे शेरे हे प्रतिकुल नसल्याची खात्री करुन पदोन्नतीस पात्र ठरविले जाते.
 • पदोन्नतीसाठी विहीत कार्यापध्दती, येष्ठता, पात्रता ,अर्हता परिक्षा ,विभागीय परिक्षा, यांची पुर्तता करणे आवश्यक आहे. कर्मचा-याची सेवाजेष्ठतेनुसार प्रवर्गनिहाय निवड यादी करण्यात येते.व संगठीत केलेल्या समितीपुढे नांवे ठेवण्यात येतात. व निवडसमिती पदोन्नती बाबत च्या सर्वनिकष पडताळून उमेदवारानां पदोन्नतीस पात्र ठरविण्यात येते.
 • निवडसूची मध्ये पात्र ठरविलेल्या मागास वर्गीय उमेदवारा साठी पुढील पदोन्नतीसाठी त्यांनी जातवैधता प्रमाण पत्र सादर करणे बंधनकारक आहे.