संक्षिप्त कार्यवाही अथवा विभगीय चौकशी अंती सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुध्द
संबंधित कर्मचारी वरिष्ठ प्राधिकार्याकडे अपिल करता येईल.
- निलंबन किंवा मानिव निलंबनाचा आदेश.
- शिक्षेचे आदेश, विहीत शिक्षेपैकी कोणतेही अपिलीय अथवा पुनर्विलोकन प्राधिकारणाने काढलेले
आदेश.
- शिक्षा वाढविणार आदेश.
- निलंबन / मानिव निलंबन कालावधीत निर्वाह भत्ता व इतर भत्ते निश्चित करणारे आदेश.
- बडतर्फ / सेवेतून काढून टाकल्यापासून ते सेवेत पुन:स्थापीत करण्याच्या तारखेपर्यंतच्या
काळातील वेतन व भत्ते निश्चित करणारे आदेश व तो सेवाबाह्य कालावधी कोणत्या प्रयोजनासाठी
व्यतीत केला तो आदेश.
अपिलाची पध्दत :-
अपिल सक्षम प्राधिकार्याला उद्देशून स्वतंत्र व स्वत:चे नावाने केले पाहिजे. अपिलाची
भाषा अस्पष्ट, अवमानकारक,अयोग्य नसावी. अंतिम आदेशात नमुद कालावधी मध्येच अपिल करणे
आवश्यक आहे. मुदतबाह्य अपिल विचारात घेतले जाणार नाही. मुदतीत अपिल करणे शक्य नसल्यास,
अपिलार्थीने अपिल अधिकार्यास तसे लेखी समर्थनिय निवेदन सादर करुन मुदतवाढ घेणे आवश्यक
आहे. अपिल संबंधित अधिकारी / प्राधिकारी यांचे मार्फतीने सादर करणे आवश्यक आहे.
अपिल रोखून ठेवणे :-
आदेशीत शिक्षा अपिल घेऊ न शकणारी असल्यास अपिल फेटाळण्यात येईल. अपिलास नमुद बाबींची
पुर्तता न केल्यास ते रोखून ठेवता येईल. अपिल प्राधिकार्याने अपिल रोखून ठेवल्यास
त्या विरुध्द अपिल करता येणार नाही.
अपिलावर विचार :-
- निलंबनाचा आदेशाविरुध्द अपिलाच्या बाबतीत निलंन संदर्भनिय आहे किंवा नाही.
- नियमात घालून दिलेल्या कार्यपध्दतीचे अनुपालन झाले आहे किंवा नाही.
- पराव्याची खात्री केली आहे काय?
- देणेत आलेली शिक्षा व वाढीव शिक्षा पुरेशी आहे काय याची खात्री करेल.
अपिल प्राधिकार्याचे आदेश :-
- दिलेली शिक्षा कायम करणे, कमी करणे, ती वाढविणार किंवा रद्द करणारा आदेश काढणे.
- दिलेल्या शिक्षेत वाढ करताना त्या अपचार्यास नोटीस देणे, त्याचे निवेदनाचा विचार करुन
घेतेलेल्या शिक्षेत वाढ करणार नाही.
- शिक्षेत वाढ केल्याचे आदेश हे दुहेरी शिक्षा समजण्यात येणार नाही.
पुन:रीक्षण (Revision):-
फेरतपासणी करणारा अधिकारी, योग्य कारणे दर्शवून शिक्षा शिथल करु शकेल. मुंबई
पोलीस (शिक्षा व अपिल) नियम 1956 नुसार ताकीद देणे, सक्त ताकीद, जादा कवायत या शिक्षे
विरुध्द अपिल करता येणार नाही.
अपील पुन:रीक्षण अर्जावर घेण्यात आलेल्या निर्णयाचे आदेश संबंधीत अपचार्यास कळविणे
आवश्यक आहे.