» मध्यवर्ती भांडार


ठिकाण :-पोलीस बिनतारी संदेश मुख्यालय चव्हाणनगर,पाषाण रोड,पुणे-8

उद्दीष्ट :- पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व संचालक पोलीस बिनतारी संदेश महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशान्वये खरेदी झालेल्या बिनतारी संच /सामुग्री व सुटे भागांची साठवणूक व वितरण.

कार्यपद्धती :-पोलीस दलास दळणवळणासाठी लागणार्‍या भांडार साहित्याची साठवणूक, देखभाल, वाटप व लेखा (Accounting) सोयीस्कर कार्यक्षम होणेसाठी भांडार साहित्याचे वर्गीकरण करून भांडाराचे पाच विभाग करण्यात आलेले आहे.

१.समिती कक्ष :- सर्व नवीन भंडार साहित्य खरेदी आदेशानुसार स्वीकृत करून रिसीट रिपोर्ट व टेस्ट रिपोर्ट करून तपासणीसाठी संशोधन व विकास विभागास देणे व घेणे .

२.भांडार विभाग १ :- बंदोबस्त राखीव संच व सामुग्री व विजेर्‍या व उपकरणे :(HF, VHF,& UHF बिनतारी संच व वाँकीटाँकी, व सदर संचास लागणार्‍या स्टोरेज बँटरीज तसेच व्हीसॅट दळणवळणास लागणारे RFT व कार्डस, क्म्युनिकेशन अँनलायझर ,सिग्नल, जनरेटर फ्रिक्वेन्सी काँऊनटर वाँटमीटर्स)

३.भांडार विभाग २ :- बिनतारी संचाचे व संगणकाचे सुटे भाग व इलेक्ट्रिकल साहित्य दळणवळणासाठी टाँवर्स ( संगणकाचे सर्व हार्डवेअर इलेक्ट्रिक वायरिंगचे सर्व साहित्य, बिनतारी संचाचे सुटे भाग उदा. ट्रान्झिस्टर्स, डायोडस्, कन्डेंसर व इतर )

४. भांडार विभाग ३ :-सर्व प्रकारच्या कोअँक्सल केबलस व वायर्स. (एक्सचेंजेस व त्याची कार्ड्स, टेलिफोन युनिट्स, अँसेम्बल्ड पिसीबीज, सर्व प्रकारच्या यागी अँन्टेना व अरीयल्स हार्डवेअर,पेंट्स,व इतर सुटे भाग.)

मध्यवर्ती भांडाराचे कामकाजाविषयी आराखडा