» खरेदी शाखा
१) राज्यातील बिनतारी संदेश घटकांकडुन मागणी ही त्यांचे परिक्षेत्रिय कार्यालयामार्फत विभागीय कार्यालयांना सादर केली जाते व विभागीय कार्यालयाकडून ती 'फ' शाखा संचालक कार्यालयात प्राप्त होते

२) फ शाखेकडून सदर मागणी केलल्या साहित्याचे खरेदी आदेश ड शाखेस अदा केले जातात.

३)खरेदी शाखेमध्ये विहित पद्धत व शासनाने दिलेल्या मार्गेदर्शक तत्वानुसार खरेदी प्रकिया खरेदी शाखेंत राबविली जाते .याकरीता निविदा काढण्या पासून साहित्य स्विकारण्यापर्यंत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर सुचना Manual of Office ProcedureFor purchase of stores by the government department यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार खरेदी प्रक्रिया ही खालीलप्रमाणे उचित असलेल्यापैकी एका पर्यायाद्वारे राबविली जाते.

       A) Rate Contract(दरकरारावर साहित्य उपलब्ध असल्यास )

       B) Tender (रु ५० हजार पेक्षा जास्त किंमत असलेले साहित्य )

       C) Quotation(स्थानिक बाजारात उपलब्ध असलेले व रु ५० हजार पेक्षा कमी असलेले साहित्य )

       D) Proprietary(मुळपुरवठादाराकडून खरेदी करावयाचे साहित्य )

४) वित्तीय अधिकारानुसार रु ५ लाखापेक्षा कमी मा.पोलीस उप महानिरीक्षक बि. सं. म. रा. पुणे यांची मान्यता घेण्यात येते .५ लाखापेक्षा जास्त व २५ लाखापेक्षा कमी असलेल्या खरेदी प्रकरणांची मान्यता मा.अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस बि. सं. म. राज्य,पुणे यांचेकडून घेतली जाते व रु.२५ लाखापेक्षा जास्त किमत असलेल्या प्रकरणाचे शासनाने दिलेल्या आदेशानुसार मान्यते करिता मा.मंत्री महोदय(गॄह)यांचे मान्यतेसाठी सादर करण्यात येते.

   जाहीर लिलावाव्दारे ज्या साहित्याची खरेदी करण्यात येते आशा सर्व साहित्याची जाहीर निविदा  Maharastra Goverment Gazette Part II मध्य॓ Publish केले जाते व त्याचप्रमाणे Director of Information & Public Relational Goverment of Maharastra new admin building 17,Floor near मंत्रालय यांचे मार्फत 'अ 'दजॉच्या नामाकींत १ मराठी व १ इग्रजी या वृत्तपत्रामध्य॓ प्रसिद्धी करण्यासाठी पाठविण्यात येते.याशिवाय सदर जाहीर निविदा www.mahapolice.gov.in. या स्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात येते .

५)खरेदी करण्यात आलेले प्रत्येक साहित्य यांचा चाचणी व स्विकृत अहवाल पोलीस उप-अधीक्षक बि. सं. सशोधन व विकास पुणे यांचे कार्यालयामध्ये केला जातो.पोलीस उप-अधीक्षक बि. सं. संशोधन व विकास पुणे यांचेकडुन स्विकृत अहवाल प्राप्त झाले नंतरच त्याचे देयक पडताळणी व योग्य दाखल्यासह मान्यता घेऊन लेखा शाखेस पुढील कार्यवाहीसाठी सादर केले जातात.