Loading Loading, please wait...
अपर पोलीस महासंचालक व संचालक,
पोलीस बिनतारी संदेश,
महाराष्ट्र राज्य, पुणे
   
» Home » Bulletin Board » Events
 
महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या संगणक प्रशिक्षण इमारतीचा भूमीपुजन समारंभ - 09-Sep-2011

महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या संगणक प्रशिक्षण इमारतीचा भूमीपुजन समारंभ दिनांक 09 सप्टेंबर 2011रोजी 1600 वाजता मा.श्री.पी.पी.पी.शर्मा,अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस बिनतारी संदेश महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचे हस्ते संपन्न झाला.समारंभास मा.श्री.अशोक धिवरे,अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य ,पुणे, श्री.रणजित सहाय,विशेष पोलीस महानिरिक्षक बिनतारी संदेश,श्री.कार्ल डिसोझा,पोलीस अधिक्षक बिनतारी संदेश,श्री.ईश्‍वर कांबळे,पोलीस अधिक्षक बिनतारी संदेश, श्री.अतुल चव्हाण,कार्यकारी अभियंता,पुणे आणि बिनतारी विभागाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्राची मुख्य इमारत बिनतारी विभागाच्या प्रशिक्षण विषयक वाढत्या आवश्यकता पूर्ण करणेच्या दृष्टिने अपूरी होती.आधुनिक संगणक प्रणालीवर आधारीत बिनतारी यंत्रणा व संगणक यंत्रणांचे सातत्याने प्रशिक्षण देण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता भासत होती.याकरीता संगणक प्रशिक्षण आवश्यकता नमूद करून विस्तारित इमारत बांधकाम मंजूरीसाठी शासनास विनंती करण्यात आली होती. यासाठी शासनाने रू.38,08,309/- इतका निधी मंजूर केला आहे.या निधीमधून या जागेमध्ये एकूण 375.62 चौ.मीटर बांधकाम सुरू करण्यात येत आहे.यामध्ये दोन ट्रेनिंग हॉल,एक संगणक लॅब,अधिकारी कक्ष व स्टाफरूमचा समावेश आहे. विस्तारित सुविधेमुळे बिनतारी विभागाच्या वाढत्या प्रशिक्षण विषयक आवश्यकता पूर्ण होणार असून, सातत्याने प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे शक्य होणार आहे व पोलीस दलास अतिशय चांगला उपयोग होणार आहे.

Photogallery: