Loading Loading, please wait...
अपर पोलीस महासंचालक व संचालक,
पोलीस बिनतारी संदेश,
महाराष्ट्र राज्य, पुणे
   


PhotoGallery

» संशोधन व विकास विभागाकडील कर्तव्ये/कामे
 
१.पोलीस उप-अधीक्षक बि. सं. संशोधन व विकास:-कार्यालयीन कामकाज, तांत्रिक कामावर देखरेख,नविन सुधारणा व त्याअनुषंगिक कामे.

२.पोलीस निरीक्षक बि. सं. (मध्यवर्ती कर्मशाळा):-चाचणी अहवाल पडताळणी, भांडार प्रमुख तांत्रिक कामावर देखरेख.

३.पोलीस निरीक्षक(उभारणी शाखा):-तांत्रिक कामावर देखरेख.टोपोशिटची देखभाल व देवाणघेवाण.

४.पोलीस उप-निरीक्षक (रेडिओ कम्युनिकेशन):-१.पोलीस आधुनिकीकरण व इतर योजनाअंतर्गत खरेदी करावयाच्या संच, वाँकीटाँकी,को-अँक्सिअल केबल, चाचणी उपकरणे,सर्व प्रकारचे स्तंभ यांचे विनिर्देश(specifications)तयार करणे २. त्यानुसार प्राप्त झालेल्या नमुन्यांचे तांत्रिक परिक्षण (evaluation)करणे.३.खरेदी झालेल्या संच वाँकीटाँकी,चाचणी उपकरणे यांची प्रत्यक्ष तपासणी अंती चाचणी अहवाल (Test report)करणे, ४.राज्यातील संच वाँकीटाँकी चाचणी उपकरणामधील क्लिष्ट दोषांचे निवारण करणे अथवा निकामीकरणाकरिता शिफारस करणे.

५.पोलीस उप-निरीक्षक (कॉम्पुटर दुरुस्ती):-१. डाटा मेसेजिंगसाठी वापरात असणारे संगणक (Motherboard, Hard disk, SMPS, Add on cards), प्रिंटर(SMPS-240,LX300),UPS, माँनिटर दुरुस्ती, २.रिबन केसेटस,CAT 5 केबल्स /LAN केबल्स व कॉम्पुटर अँक्सेसरीजचा टेस्ट रिपोर्ट तयार करणे. ३.संचालक कार्यालय, पोलीस उप-अधीक्षक कार्यालय,मध्यवर्ती भांडार व प्रशिक्षण केंद्र येथील कॉम्पुटर व नेटवर्क संबंधीत दुरुस्ती व देखभाल करणे.४. डेक्सटाँप,लॅपटाँप व व्हाँईस लाँगर इत्यादीचे चाचणी व पृथ्थकरण करणे.

६.पोलीस उप-निरीक्षक (संशोधन विभाग):- १. इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा अभ्यास करून ट्रायल साँफ्टवेअर डाउनलोड करून त्याचा चाचण्या घेणे व पोलीस बिनतारी संदेश विभागास त्याचा कसा वापर करता येऊ शकेल याबाबत अभ्यास करणे. २.नवनविन साधनसामुग्री खरेदी करताना त्यांचे विनिर्देश इंटरनेट मार्फत माहिती एकत्र करून तयार करणे.सदर विनिर्देशांचा अभ्यास करणे व पुरवठादार कंपनीशी संपर्क साधून सदर सामुग्रीचा डेमो अँरेंज करणे व कंपनी प्रतिनिधीकडून अधिक तांत्रिक माहिती घेणे.३.नविन तंत्रज्ञानासंबंधी विविध सेमिनारसाठी हजर राहून त्यासंबंधी माहिती एकत्रीत करणे व सदर तंत्रज्ञान पोलीस विभागासाठी कशाप्रकारे उपयुक्त ठरेल यांचा अभ्यास करणे.

७.पोलीस उप-निरीक्षक (उभारणी शाखा):- १.संचालक कार्यालय येथील सर्व प्रकरची विद्युत कामे जनरेटर मार्फ़त राखीव वीज/डिझेल इंजिनची दुरुस्ती व देखभाल पथदिवे दुरुस्ती व देखभाल विद्युत उपकरणे व ए.सी. दुरुस्ती कामे, २.चव्हाणनगर मुख्यालय येथील शासकीय निवासस्थान येथील पाण्याच्या मोटारीची देखभाल, शासकीय निवासस्थानांचे ताबा देणे घेणे, PWD मार्फत दुरुस्ती व देखभाल करणे, त्यांचे रेकाँर्ड ठेवणे, ३.चव्हाणनगर व कावेरीनगर येथील विद्युत देयके म.रा.वि. मंडळाकडून प्राप्त करून घेणे व नोंदी घेऊन प्रशासन शाखेस पाठविणे, ४.भांडार विभागाचे तसेच चाचणी अवहाल यांच्यावर देखरेख व नोंदी ठेवणे,५.खरेदी कामे, ६.टोपोशिटच्या नोंदी अद्ययावत ठेवणे व मागणीप्रमाणे टोपोशीट्स देणे,७.आरेखक यांचेकडून विविध नकाशे तयार करणे,८.संचालक कार्यालय यांना लागणारे प्रापर्टी कार्ड,मिळकत कर,पाणी देयक, ७/१२ उतारे ई.प्राप्त करून घेणे व सादर करणे.

८.पोलीस उप-निरीक्षक लाइन कम्युनिकेशन:-१.बिनतारी विभागातील BPL व C-DOT एक्सचेंजचे कार्ड व FCBC यांची दुरुस्ती.२.नवीन खरेदीकरिता एक्सचेंजची चाचणी व पृथ:करण ऑनलइन प्रोग्रमिंक, संचालक कार्यालयातील सर्व व्हाँईस लाईन्स देखभाल व दुरुस्ती. ३.टर्मिनल स्थानक BPL Exch ची देखभाल व दुरुस्ती ४. मा.अपर पोलीस महासंचालक मा. पोलीस उप-महानिरीक्षक व मा. पोलीस अधीक्षक मुख्यालय यांचे कार्यातीलयातील व निवासस्थांनातील टेलिफोन व ब्राँडबँड कनेक्शन देखभाल व दुरुस्ती, ५.फँक्स मशिन,फँक्स रोल,टेलिफोन केबल्स, टेलिफोन युनिट, IP फोन व Digital फोन यांची चाचणी करणे.६.BPL Exchange कार्डचे विविध सुटे भाग चाचणी. ७. पुणे-२ टर्मिनल ते HSP Khadki व IGMT हाँट लाईनन्सची देखभाल व दुरुस्ती .८. जुने C-DOT Exchange निकामीकरण करणे.

९.पोलीस उप-निरीक्षक (वीजतंत्री विभाग):-१.सर्व प्रकारचे मिनी व मेन्स चार्जर (३६,७२ volt) देखभाल व दुरुस्ती करणे (H/duty )१२ v विजेर्‍या लेड असिड व एस.एम. एफ चाचणी व पृथ्थकरण अहवाल तयार करणे, २.वाँकीटाँकी विजेर्‍या व ड्राय बॅटरीज १२ v ७व १७ AHC विजेर्‍या, स्तंभ यांची चाचणी पृथ्थकरण अहवाल तयार करणे,३.वाँकीटाँकी चार्जर, बेस व कार्यालयातील लोखंडी वस्तूची दुरुस्ती करणे,. ४. इनव्ह॔टर व UPS यांचे देखभाल व दुरुस्ती व चाचणी अहवाल तयार करणे, ५. पाँवर सप्लाय, व्होल्टेज स्टँबिलायझार दुरुस्ती व चाचणी अहवाल तयार करणे., ६. अँम्प्लीफायर, स्पीकर माईक साहित्याची शासकीय कामाकरिता उभारणी करणे. ७. विद्युत साहित्य वेगवेगळया वायर्स बल्ब, ट्युबलाईट, स्टार्टर यांची चाचणी पडताळणी, ८ विजेर्‍यांचे निकामीकरण व इतिहास पुस्तके लिहिणे, ९. हाय बँड व लो बँड यागी व डायपोल एरियल तयार करणे, १०.मध्यवर्ती भांडाराकडे खरेदी केलेल्या लोखंडी व अँल्युमिनियम साहित्याची चाचणी व पृथ्थकरण , ११. रिपिटर येथे संच ठेवणेकामी अँल्युमिनियम चासीज तयार करणे.