Loading Loading, please wait...
अपर पोलीस महासंचालक व संचालक,
पोलीस बिनतारी संदेश,
महाराष्ट्र राज्य, पुणे
   


PhotoGallery

» प्रशिक्षण केंद्राची कामे
 

कलम चार (१)(बी)(i)

       पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे पोलीस बिनतारी विभागातील नवप्रविष्ट रेडियो यांत्रिकी,यंत्रचालक यांना मुलभूत पाठयक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते.

       बिनतारी तंत्रज्ञानामध्ये वेगाने होत असलेल्या विकासाबाबत व पोलीस बिनतारी विभागामध्ये वेळोवेळी उपयोगामध्ये आणल्या जाणार्‍या वेगवेगळया तंत्रज्ञानाबाबत / दळणवळण प्रणालीबाबत पोलीस बिनतारी अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी वेळोवेळी उजळणी पाठ्यक्रम घेतले जातात.

       पोलीस बिनतारी विभागातील रेडिओ यंत्रिक/ वीजतंत्री /यंत्रचालक यांच्याकरिताच्या वार्षिक खातेनिहाय परीक्षांकरिता मार्गदर्शनासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात.

       पोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्र,पुणे येथे प्रशिक्षणार्थी व पोलीस बिनतारी अधिकारी /कर्मचारी यांच्याकरिता ग्रंथालय आहे.ग्रंथालयमध्ये तंत्रज्ञान विषयक १०७० व इतर विषयक ४९१ अशी एकूण १५६१ इतकी ग्रंथसंपदा आहे प्रशिक्षणार्थीकरिता प्रशिक्षण कालावधीमध्ये व पोलीस बिनतारी अधिकारी / कर्मचारी यांचाकरिता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये ग्रंथालयाची सेवा उपलब्ध आहे.

       पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र,पुणे येथे प्रशिक्षणास येणार्‍या अधिकारी /कर्मचार्र्याकरिता दोन वसतीगृहांमध्ये १०२ प्रशिक्षणाथ्रीची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच प्रशिक्षाणार्थिकरिता भोजना्लयाची व्यवस्था आहे.

       याशिवाय पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये बिनतारी तंत्रज्ञानाच्या उदगमापासून आढावा घेणारे संग्रहालय आहे. संग्रहालयामध्ये एकूण ४० बिनतारी यंत्रणा व ११० माहिती पत्रके/छायचित्र॓ प्रदशि॔त केलेली आहेत.पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत सदर संग्रहालय पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

       नागरिकांकरिता,महाविद्यालयीन विद्यार्थी बिनतारी विषयक अभ्यासक यांनाही या संग्रहालयाचा फायदा व्हावा याकरिता सदर संग्रहालय पुर्वानुमतीने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी,कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी खुले आहे.याबाबत संबंधीतांनी कृपया पोलीस उप-अधीक्षक बिनतारी संदेश,प्रशिक्षण केंद्र,पुणे याना ०२०-२५६५२५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा अगर खालील नमुद ठिकाणी पत्राद्वारे विनंती करावी.

       पत्ता :- अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश,यांचे कार्यालय(प्रशिक्षण केंद्र)पाषण रोड,चव्हाणनगर, पुणे ४११००८